बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हीची आगामी वेब सिरीज आर्या सीजन-3 ची शूटिंग पुन्हा सुरू झाली आहे. सुष्मिता सेनने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर करत ही बातमी शेअर केली आहे. यामध्ये सुष्मिता अतिशय फिट लुक मध्ये पाहायला मिळत आहे. सुष्मिताने एक जबरदस्त पोस्टर पोस्ट करत ट्विटर हँडलवर टिझर देखील पोस्ट केला आहे.
गेल्याच महिन्यात सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका आला होता. सुष्मिता सेनने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली होती. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अँजिओप्लास्टीही करण्यात आल्याचं सुश्मितान सांगितलं होतं. यातून आता पूर्णपणे बरी होऊन सुश्मिताने आर्याच्या सीजन 3 ची शूटिंग सुरू केली आहे. तिने आपल्या ट्विटर अकाउंटवर टीझर रिलीज केला आहे.
सुश्मिताने टीजर शेअर करत लिहिले आहे की, “ती स्वार्थी आहे. ती निडर आहे. ती परत आली आहे. आर्या सीझन ३ चे शूटिंग पुन्हा सुरू झाले आहे…” या व्हिडिओ क्लिप मध्ये सुश्मिता खूपच फिट दिसत आहे तिच्या हातात तलवार असून ती यामध्ये तलवारबाजी करताना दिसत आहे.
She’s meaner. She’s fearless. She’s back. #AaryaSeason3 resumes shoot. #HotstarSpecials #Aarya3. Coming soon only on @DisneyPlusHS#AaryaS3OnHotstar @officialRMFilms @EndemolShineIND @RamKMadhvani @Amita_Madhvani
#KapilSharma #ShraddhaPasi #SiaBhuyan #KhushbooAgarwalRaj… pic.twitter.com/isZWYnGPZW— sushmita sen (@thesushmitasen) April 25, 2023