शबनम न्यूज | पिंपरी
‘नब्ज़ ईद विशेषांक’ हा मुस्लिम समाज आणि संस्कृती यांचा सच्चा परिचय करून देत इतर जात-धर्मीय समाजांशी संवादाचे पूल बांधण्याच्या उद्देशाने दरवर्षी प्रसिद्ध केला जातो. त्याच उद्देशाने ‘नब्ज़’कडून ‘भारतीय मुस्लिम’ या थीमवर एक आगळीवेगळी फोटोग्राफी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेत छायाचित्रांच्या माध्यमातून मुस्लिम माणसं, त्यांचं दैनंदिन आयुष्य, त्यांचा भवताल-संस्कृती, त्यांची मानसिकता, या संस्कृतीची भारतीय मातीशी जोडलेली नाळ अशा विविध गोष्टी मांडल्या जाणं अपेक्षित आहे. या स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध छायाचित्रकार रफिक सय्यद, सुधाकर ओलवे आणि संदेश भंडारे यांच्याकडून करण्यात येईल.
१) स्पर्धा व्यावसायिक आणि हौशी अशा दोन गटांत घेतली जाईल.
२) प्रत्येक व्यक्तीला स्पर्धेसाठी ५ फोटो पाठवता येतील. प्रत्येक फोटोसोबत एक कॅप्शन पाठवणे आवश्यक आहे.
३) स्पर्धकांनी ओरिजनल आणि स्वतः काढलेला फोटो पाठवणे अपेक्षित आहे.
४) स्पर्धेत पुरस्कारप्राप्त ठरलेले फोटो (स्पर्धेसाठी पाठवण्यात आलेल्या निवडक फोटोंसह) ‘नब्ज़ – ईद विशेषांक 2024’ मध्ये प्रसिद्ध केले जातील.
५) मार्च 2024 च्या पहिल्या आठवड्यात पारितोषिकप्राप्त विजेत्यांची नावे जाहीर करण्यात येतील. एप्रिल 2024 मध्ये, ‘नब्ज़’ विशेषांकाचे प्रकाशन झाल्यानंतर सर्व विजेत्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.
७) स्पर्धेसाठी फोटो पाठवताना सर्व सहभागींना स्पर्धेचे नियम आणि अटी मान्य असतील असे गृहीत धरण्यात येत आहे.
स्पर्धेसाठी फोटो पाठवण्याचा अखेरचा दिवस – 15 फेब्रुवारी 2024
स्पर्धकांनी सविस्तर माहितीसह (नाव, ईमेल, मोबाईल क्रमांक, स्पर्धेचा विभाग) स्पर्धेसाठीचे फोटो ‘नब्ज़’च्या ईमेलवर पाठवावेत.
किंवा
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोबतचा फॉर्म भरावा. – https://bit.ly/3tR33CI
nabzeditor@gmail.com
संपर्क- 9960503623/ 9029557767