शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला बचत गटाच्या शक्ती वंदन कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद पहावयास मिळाला.
यावेळी येणाऱ्या वर्षात बचत गटाच्या महिलांसाठी सुविधा ,बाजारपेठा व महिला सक्षमीकरण या विषयी माहिती देण्यात आली.
Advertisement
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती सुजाताई पालांडे (जिल्हा अध्यक्ष भाजपा महिला मोर्चा), कविताताई हिंगे (प्रदेश सचिव महिला मोर्चा मावळ लोकसभा संयोजिका ), अनघा रुद्र ( महिला मोर्चा भाजपा सर चिटणीस ), कल्पनाताई भोईर, पल्लवीताई पाठक, दिपालीताई संजय कलापुरे, व बचतगटातील सर्व महिला उपस्थित होत्या.