शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.३० मार्च) :- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर बुधवारी काही समाजकंटकांनी हल्ला केला असून सुरक्षा बॅरियर व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली. या घटनेनंतर पिंपरी चिंचवड शहराचे आप चे शहराध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे यांनी केजरीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया देत निषेध व्यक्त केला आहे.
त्यांनी सांगितले आहे कि, पोलिसांच्या संगनमताने भाजपच्या गुंडांनी दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानी सुरक्षा कवच तोडून, सीसीटीवी व इतर संसाधनांची नासधूस करत मुख्यमंत्र्यांच्या जीवितास घातपात करण्याचा प्रयत्न केला, याची आम्ही निंदा करतो.
भाजप केजरीवाल यांना पराभूत करू शकत नाही म्हणून ते त्यांना मारण्याचा प्रयत्न करत आहेत. आजची घटना म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या हत्येचा भाजपचा पूर्वनियोजित डाव होता. पंजाबमध्ये आपचा विजय आणि भाजपचा पराभव यामुळे भाजपला अरविंद केजरीवाल यांची हत्या करायची आहे. असा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे.आजची हि कृती म्हणजे भाजपने विचारांच्या लढाईत पराभव स्वीकारल्याचे लक्षण आहे. असेही, आपने म्हटले आहे.