ज्येष्ठ मल्याळम अभिनेते मामूकोया यांचे निधन झालं. विनोदी भूमिकासाठी ते लोकप्रिय होते. मामूकोया यांनी आज बुधवार दिनांक 26 एप्रिल रोजी केरळ मधील कोळीकोड येथे एका खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते 76 वर्षाचे होते. त्यांच्या निधनानंतर मल्याळम चित्रपट सृष्टीत शोक व्यक्त करण्यात येत आहे.
मामूकोया यांनी अनेक सुपरहिट मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलंय आणि त्यांच्या अनेक भूमिका खूप गाजल्या होत्या. सोमवारी ते जिल्ह्यातील एका फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनासाठी गेले होते. उद्घाटन करताना ते खाली कोसळले होते, त्यानंतर त्यांना वंदूर येथील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं तिथून त्यांना कोवळीकोड येथील मित्र रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. त्यानंतर मिळालेला माहितीनुसार त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर रक्तस्त्राव झाला त्यामुळे त्यांचे निधन झाले.