शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पिंपरी पोलीस स्टेशन येथे सुसज्ज महिला कक्ष व हिरकणी कक्षाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते करण्यात आले.
पिंपरी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड येथे असलेल्या महिला कर्मचारी व बाहेरून तक्रार देण्यात आलेल्या महिला तक्रार यांना स्वच्छतागृह व फीडिंग कक्ष उपलब्ध नसल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिंपरी पोलीस स्टेशन यांनी केएसबी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर राजीव जैन यांना पिंपरी पोलीस ठाण्याकडील महिलांसाठी विश्रांती कक्ष व हिरकणी कक्ष स्थापन करून देण्याची मागणी केली असता, या मागणीची दखल घेत पिंपरी पोलीस ठाण्यामध्ये महिलांसाठी एक सुसज्ज विश्रांती कक्ष, एक प्रशस्त हॉल, विश्रांती कक्ष व हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले.
यावेळी बोलताना आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले की, “केएसबी लिमिटेड कंपनी ही मल्टिनॅशनल कंपनी असून, त्यांनी सामाजिक बांधिलकी जपून पोलिसांसाठी केलेले काम हे वाकण्याजोगे आहे. तसेच पोलिसांनाही या योगदानाची सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून काम करावे, असे मत व्यक्त केले.
तसेच केएसबी लिमिटेडचे एचआरडी शिरीष कुलकर्णी यांनी पिंपरी पोलीस स्टेशन येथे बांधून दिलेल्या महिला कक्षा बाबत म्हणाले की, “आम्ही पिंपरी चिंचवड पोलिसांसाठी एक खारीचा वाटा दिला असेल, याच्या लाख पटीने पिंपरी चिंचवड पोलिसांचे काम आहे, अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे, पोलीस उपायुक्त विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे तसेच केएसबी लिमिटेडचे राजीव जैन मॅनेजिंग डायरेक्टर, केस बी लिमिटेडचे एचआरडी शिरीष कुलकर्णी यांच्यासह केएसबी चे अधिकारी, स्टाफ तसेच पिंपरी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच शांतता कमिटीचे महिला दिपाली देशमुख, कविता खराडे,अमृता वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते. पिंपरी पोलीस स्टेशन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी केएसबी लिमिटेडचे व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.