शबनम न्युज | पिंपरी
सिटी प्राईड स्कूल मध्ये ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या वतीने क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुणे सविता काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शाळेचे संस्थापक श्री अरुण चाबुकस्वार मुख्याध्यापिका सौ नाझनीन शेख उपमुख्याध्यापक श्री. सचिन कळसाईत सर, तसेच शिक्षक व शिक्षिकेत्तर कर्मचारी विद्यार्थी- पालक उपस्थित होते.
यावेळी शिक्षकांनी ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत संस्थापक अरुण चाबुकस्वार असे म्हणाले, देशाच्या आणि मानवाच्या सर्वांगिन प्रगती साठी शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे ज्योतिबाच्या अनेक पैलूंवर आरुष हिबारे, खुशबू सिंग, साईराज मिटकर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर पथनाट्य सादर केले तसेच निशा पवार ,जयश्री घोलप, भावना देवरे मॅडम यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल माहिती सांगितली. रेणू राठी यांनी सूत्रसंचालन केले व निशा परमार यांनी आभार मानले.