शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी मध्ये साखरपुडा झाल्यानंतर महिलेला लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने महिला फिर्यादी यांची इच्छा नसताना देखील त्यांच्या मनाविरुद्ध, जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून फिर्यादी यांच्यासोबत बलात्कार केले. तसेच शेअर मार्केट करिता घेतलेले पैसे फेडण्यासाठी फिर्यादी यांच्याकडून 5 लाख 22 हजार रुपयांची फसवणूक केली.
याप्रकरणी 22 वर्षीय महिला फिर्यादी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार कुणाल संतोष चौधरी, संतोष चौधरी (दोघेही रा. गंजपेठ, महात्मा फुले वाडा जवळ, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये साखरपुडा झाल्यानंतर आरोपी याने फिर्यादी यांना महाबळेश्वर येथे नेऊन तेथील एका लॉजवर त्यांच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर वारंवार नाना पेठ येथे घेऊन जाऊन लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यासोबत बलात्कार केला. त्यानंतर दोन्ही आरोपींनी मिळून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून शेअर मार्केट करिता घेतलेले पैसे फेडण्याकरिता फिर्यादीस लोन काढण्यास भाग पाडून 5 लाख 22 हजार रुपयांची फसवणूक केली. तसेच फिर्यादी यांच्यासोबत भांडण करून त्यांच्यावर संशय घेऊन “तुझ्याकडून पैसे घेण्याकरिताच लग्न जमवले होते,” असे म्हणून “मी तुझ्याशी लग्न करणार नाही, जर पैसे मागायला आली, तर तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकेल,” अशी धमकी देऊन अर्वोच्च भाषेत शिवीगाळ केली. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात भा.द.वि. कलम 376, 420, 504, 506, 34, अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.