शबनम न्युज | पुणे
पुण्यातील स्वारगेट बस डेपोबाहेरील खाद्यपदार्थांच्या गाडीतील घरगुती एलपीजी सिलिंडरला शुक्रवारी पहाटे आग लागली यामध्ये गाडी जळून खाक झाली. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुणे अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला पहाटे २.४६ वाजता स्वारगेट बस डेपोबाहेर एका फास्ट फूड गाडीला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पाण्याचे टँकर सेवेत येथे उपस्थित करण्यात आले व आग विझविण्यात आली.
अग्निशमन अधिकारी पीआर खेडेकर यांनी सांगितले कि, “आम्ही तीन मिनिटांत घटनास्थळी पोहोचलो. हातगाडीतील घरगुती एलपीजी सिलिंडरला आग लागल्याचे पाहिले. सिलिंडरमधून एलपीजी लिक झाल्यामुळे आग लागल्याचा आम्हाला संशय आहे. आम्ही तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, असे खेडेकर यांनी सांगितले.
Advertisement