शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कचरा संकलनाच्या नावाखाली शहरवासीयांवर लावलेला उपयोगकर्ता शुल्क रद्द करण्यात यावा, अशी मागणी माजी विरोधी पक्ष नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी मनपा आयुक्त शेखर सिंह यांना केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे कि, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कचरा संकलनाच्या नावाखाली संपूर्ण शहरातील मिळकतधारकांच्या घरपट्टी पत्रकामध्ये २०१९-२० चा उपयोगकर्ता शुल्क थकबाकी म्हणून ५४० रु मिळकतकराच्या बिलात ही रक्कम जमा केली असून ती वसूल देखील करीत आहे तसेच दरवर्षीच्या कर मिळकत पत्रिकेमध्ये अश्या प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार आहे हे, अन्यायकारक असून तत्काळ हा निर्णय रद्द करण्यात यावा. मुळातच अश्या कोणत्याही प्रकारचा कचरा संकलनाचा नावाखाली उपयोगकर्ता शुल्क मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी सारख्या महानगरपालिका घेत नाही मग आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस अशा प्रकारचा उपयोगकर्ता शुल्क घेण्याची एवढी घाई का..? शहरातील नागरिक कररूपातून लाखो रुपये कर महानगरपालिकेस भरतात, ते भरून सुद्धा त्यांना महानगरपालिका पुरेश्या मुलभूत सोयी सुविधा देत नाही तसेच प्रशासक राजवटीच्या नावाखाली मनपा विविध कर व शुल्काच्या माध्यमातून शहरातील नागरिकांनची लुट करीत आहे. तरी मा.आयुक्त महोदय उपयोगकर्ता शुल्कचा नावाखाली शहरवासीयांची चाललेली लुट थांबवावी व त्याबाबत काढलेला आदेश त्वरित रद्द करण्यात यावा, असेही सदर निवेदनात नाना काटे यांना नमूद केले आहे.