शबनम न्युज | पिंपरी
महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक संपन्न झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील दोन ठिकाणी पर्यावरण विभागामार्फत घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली.
मनपाचे क्रीडा विभागास आवश्यक विविध इंनडोअर जिम साहित्य नमुन्याचे स्पेशिफिकेशनप्रमाणे तांत्रिक तपासणी अहवालाकरीता सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ,पुणे यांना अदा करावयाचे मानधनास मान्यता देण्यात आली.
एम.डी.आर.-३१ रस्त्यावरील खोदलेल्या चरांची व फुटपाथची दुरुस्ती करणे व आवश्यकतेनुसार रस्ता रुंदीकरण करणे तसेच रस्त्यावरील स्थापत्य विषयक कामे करण्यास मान्यता देणेत आली. बोपखेल फाटा ते आळंदी रस्त्याचे तसेच देहु ते आळंदी रस्त्यावरील खोदलेल्या चरांची व फुटपाथची दुरुस्ती करणे, रस्त्यावरील स्थापत्य विषयक कामे करणेबाबत मान्यता देण्यात आली.
त्याचप्रमाणे एम्पायर ईस्टेट येथील सेवा रस्त्यांचे डांबरीकरण करणेबाबत येणाऱ्या खर्चास मान्यता देणेत आली.
महापालिका मुख्य कार्यालय व इतर विविध कार्यालयातील संगणकीय केबल नेटवर्क करणेबाबत, महानगरपालिकेच्या नविन कार्यालयांना इंटरनेट सेवा उपलब्ध करून देणेबाबत मान्यता देण्यात आली.
मनपाचे क क्षेत्रिय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र.८ मधील विविध उद्याने देखभाल करणेबाबत,
मनपाचे विविध सामुदायिक व सार्वजनिक शौचालयाचे स्वच्छता व देखभाल दुरुस्तीचे कामकाज करणेबाबत येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
टेल्को रस्त्यावरील चरांची व फुटपाथची दुरुस्ती करणे व आवश्यकतेनुसार रस्ता रुंदीकरण करणे तसेच रस्त्यावरील स्थापत्य विषयक करणेबाबत मान्यता देण्यात आली.
कोविड-१९ जैव वैद्यकीय कचरा गोळा करणे आणि त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
वैद्यकीय विभागामार्फत तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची कंत्राटी वेतनावर करारनामा करून ११ महिन्याकरिता नेमणूक करणेबाबत मान्यता देण्यात आली.
पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य रस्ते,महामार्ग, बी.आर.टी.रोड व १८ मी. पेक्षा मोठ्या रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
मनपाचे आरोग्य विभागासाठी क्लॉथ बॅग व्हेंडिंग मशीन खरेदी करणे, महानगरपालिकेच्या विविध विभागास अभिलेख रुमाल खरेदी करणे तसेच मनपा रुग्णालयांतील ओटी/विभागास रुग्ण व डॉक्टर यांचे करीता गणवेश खरेदीसाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.