शबनम न्यूज, वृत्तसंस्था :
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन भोसरी एमआयडीसी येथे झाला यावेळी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन व हिंदुस्तान माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार सेना तर्फे कामगार बंधूंचा आणि भगिनींचा सन्मान करण्यात आला
तसेच कामगार बंधू भगिनींनी महाराष्ट्र दिनाचा जल्लोष साजरा केला तसेच भोसरी एमआयडीसी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे साहेब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना व संयुक्त महाराष्ट्रात चळवळीत सहभागी हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले .भोसरी एमआयडीसी याबद्दल संपर्क कार्यालय येथे अध्यक्ष श्री अभय भोर भोसरी स्पाईन रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र निकाळजे प्रमुख उपस्थिती होती याबाबत आणि निकाळजे साहेबांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला
याप्रसंगी बोलताना अध्यक्ष श्री अभय भोर यांनी सांगितले कंत्राटदार मजुरांची कॉन्ट्रॅक्टर पिळवणूक करत असून त्या विरोधात कामगारांनी एकत्र येण्याचे गरजेचे आहे कंपन्या कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट देतात परंतु कॉन्ट्रॅक्टर मजुरांना कमी पेमेंट देऊन त्यांच्यावर अन्याय करत असतात तो बंद झाला पाहिजे पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र निकाळजे यांनी कामगारांनी आपल्या न्याय हक्कासाठी संविधान हा हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला असून कायदा आणि न्याय व्यवस्था याच्यावर विश्वास ठेवून प्रत्येक कामगाराला कायदा माहिती झाला पाहिजे तरच कामगारांवर होणारा अन्याय बंद होऊ शकेल असे आपल्या वक्तव्यात सांगितले दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्ष दुर्गा भोर यांनी महिला कामगारांना अद्यापही एमआयडीसी परिसरात मूलभूत सुविधा मिळत नसून सुरक्षा रक्षक काम करणाऱ्या महिलांना आजही 12 12 तास काम तसेच एकही दिवस सुट्टी मिळत नसल्याची खंत व्यक्त करून त्यावर आता तीव्र आंदोलने उभारण्याचा विचार व्यक्त केला याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित असून कामगार बंधू आणि भगिनींनी उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला