शबनम न्युज | पुणे
दहावीचे बनावट प्रमाणपत्र बनवून देणाऱ्या चार जणांच्या टोळीला पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे. संदीप कांबळे, कृष्णा सोनाजी गिरी, अल्ताफ शेख, इमरान सय्यद ,इब्राहिम सय्यद असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आतापर्यंत 35 जणांना अशी फसवी प्रमाणपत्र दिली आहेत. पोलिसांनी सांगितले की, त्यांना फेब्रुवारीमध्ये माहिती मिळाली होती की सांगली येथील संदीप कांबळे नावाचा एक व्यक्ती दहावीची बनावट प्रमाणपत्र विकत आहे. त्यानंतर तपासा दरम्यान संदीप कांबळे हा दहावीचे बनावट प्रमाणपत्र विकत असल्याचे निष्पन्न झाले. पुणे शहर पोलिसांनी संदीप कांबळे याला अटक केली त्यानंतर त्याच्या सहकारी आरोपींना देखील अटक करण्यात आली. आरोपी हे एका प्रमाणपत्रासाठी 60 हजार रुपये आकारणार असल्याचे सांगितले. तपासा दरम्यान कांबळे यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबाद येथील संशयतांकडून बनावट प्रमाणपत्र घेतल्याचे सांगितले. त्यानुसार इतर चौघांनाही अटक करण्यात आली.