शबनम न्युज | पुणे
व्यावसायिकाला शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या गुंडांना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना विमान नगर भागातील गंगापूरम सोसायटी परिसरात घडली. याबाबत एका व्यावसायिकाने फिर्याद दिली त्यानुसार, रोहित नागेश कोळी (वय 22, रा. लोहगाव), सोमनाथ दीपक गायकवाड (वय 21, रा. विमान नगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कोळी आणि गायकवाड सराईत गुन्हेगार आहेत. गंगापूरम सोसायटी भागात काकाचा चहा नावाचे दुकान आहे. कोळी आणि गायकवाड दुकानात शिरले आणि व्यावसायिकाला शस्त्राचा धाक दाखवून खंडणीची मागणी केली, व्यावसायिकाला मारहाण करून आरोपी पसार झाले, कोळी आणि गायकवाड म्हाडा कॉलनी परिसरात मोकळा मैदानात थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी दादासाहेब बर्डे, नाना करचे, योगेश थोपटे यांना मिळाली असता, पोलिसांनी सापळा आरोपींना अटक केली.
सदर कारवाई पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विलास सोंडे, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता माळी, सचिन जाधव, सचिन कदम, गिरीश नाणेकर आदींनी ही कारवाई केली.