मुंबई : शबनम न्यूज
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयात उद्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील सरकार स्थिर आहे. एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत. 2024 च्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वात लढल्या जातील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
Advertisement