शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
भेसळयुक्त पनीर तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला असून याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण 4 लाख 66 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
साजिद मुस्तफा शेख (वय 32, रा. शिवतीर्थ, नगर थेरगाव) जावेद मुस्तफा शेख (वय ३८) राकेश श्रीबुद्धरामसिंह (वय 26, रा. चिंचवड पुणे) अल्ताफ हजारातदिन शेख (वय 27, रा. चिंचवड पुणे) अभिषेककुमार योगेशबाबु यादव (वय 22, रा. चिंचवड पुणे) सरफराज शराफतउल्ला शेख (वय 35, रा. चिंचवड पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून भेसळयुक्त पनीर तयार करण्यासाठी वापरत असलेले 14 हजार रुपये किमतीचे 140 लिटर ऍसिटिक ऍसिड, 6,320 रुपये किमतीचे सहा लिटर आरबीडीन तेल, 4,500 किमतीचे 25 किलो मोनो स्टीयरेत, 3 लाख 32,500 रुपये किमतीचे 875 किलो स्कीम मिल्क पावडर, 1 लाख 922 रुपये किमतीचे 546 किलो भेसळयुक्त तयार पनीर असा एकूण 4 लाख 66 हजार 520 रुपये किमतीचा मुद्देमाल अन्नसुरक्षा अधिकारी यांनी जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड परिसरात भेसळयुक्त पदार्थाची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, या घटनेला आळा घालण्यासाठी खंडणी विरोधी पथकाने पथक तयार करून मे. महाराष्ट्र मिल्क डेअरी,सर्वे नंबर 295 गणपती मंदिराजवळ, पुणे येथे भेसळयुक्त पनीर तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारखान्यावर छापा मारून एकूण 4 लाख 66 हजार 520 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सदर कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त गुन्हे स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ.प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक दुधावणे, पोलिस अंमलदार प्रदीप गोडांबे, विजय नलगे, चंद्रकांत जाधव, किरण काटकर यांनी केली आहे.