शबनम न्युज | हडपसर
पुण्यातील हडपसर भागात मुलानेच वडिलांचा खून केल्याची घटना समोर आली आहे. वडिलांनी दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून मुलानेच काठीने मारहाण करून आणि गळा कापून वडिलांचा खून केला. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवी शिरसागर (वय 52,रा.घुले पाटील कॉलनी, मांजरी रेल्वे गेट जवळ, मांजरी बुद्रुक) असे खून झालेल्या पिताचे नाव आहे. तसेच मुलगा ओमकार रवी शिरसागर (वय २७) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपी मुलाची आई रेखा रवी शिरसागर (वय 40) यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
Advertisement