शबनम न्युज / पिंपरी चिंचवड
दत्त नगर, विद्या नगर, शंकर नगर परिसरामध्ये अहिल्यादेवी होळकर शासकीय दवाखाना ,दत्त मंदिरासमोर दत्तनगर.या ठिकाणी नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या प्रयत्नामुळे मोफत लसीकरण सुरू करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर, नगरसेवक तुषार हिंगे यांच्या हस्ते मोफत लसीकरणाचे उद्घाटन करण्यात आले.
Advertisement
गर्दी टाळण्यासाठी रोज फक्त 50 डोस दिले जातील. १८ वर्ष ते 45 वर्षांमधील सर्व नागरिकांना हे डोस मोफत दिले जाणार आहे. तरी सर्वांनी टप्प्याटप्प्याने याचा फायदा घ्यावा लसीकरणाच्या ठिकाणी जास्त गर्दी करु नये, असे आवाहन यावेळी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी केले आहे.
सदर लसीकरणाची वेळ सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत राहणार असल्याची माहिती नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी दिली आहे.
Advertisement