शबनम न्युज | पुणे
अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांचे सध्या शिवपुत्र संभाजी या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रभर होत आहे. त्यांच्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे त्यांच्या महानाट्याची आयोजन करण्यात आले. मात्र, या संदर्भात पोलिसांनीच धमकी दिल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक ट्विट केलं आहे.
या ट्वीटमध्ये त्यांनी सांगितले की, अमोल कोल्हेंच्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा प्रयोग आज पिंपरीत होत आहे. त्यासाठी तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच नाटकाची भुरळ पडली आहे. त्यामुळे तिकीट खरेदीसाठीची चाहत्यांची आणि शिवप्रेमी, शिवप्रेमी संघटनांची गर्दी होत आहे. मात्र, महानाट्य साठी काही पोलिस अधिकाऱ्यांनी मोफत तिकिटांची मागणी केली, तसेच जर मोफत तिकीट मिळाले नाही, तर शो बंद पाडू , अशी धमकी पोलिसांनी दिल्याचे पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून म्हंटले. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या घटनेची दखल घेऊन लक्ष घालावे, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.
लोकसभेचे सदस्य व लोकप्रिय कलाकार असलेले डॉ. अमोल कोल्हे हे सध्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील महानाट्याचे प्रयोग राज्यभर करत आहेत. राज्यभर त्यांच्या प्रयोगांना उदंड प्रतिसाद मिळत असून छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवन व कार्याविषयी जनजागृती होत आहे. मात्र पिंपरी चिंचवड…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 14, 2023
Advertisement