शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख पर्यावरण, पर्यटन व राज्य शिष्टाचार मंत्री, आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १२ रोजी युवासेना भोसरी विधानसभेच्या वतीने, संपर्क प्रमुख सचिन भाऊ आहेर , विधानसभा संपर्क प्रमुख केसरीनाथ पाटील ,जिल्हा संघटीका सुलभाताई उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली १००१ झाडे लावण्याचा निचय करून आज ५०० निसर्ग उपयोगी झाडे त्या मध्ये पिंपळ, वड, कडूलिंब अशा प्रकारची रोपे दुर्गा टेकडी येथे लावण्यात आली.
यावेळी युवासेना पिंपरी चिंचवड शहर प्रमुख अजिंक्य रामभाऊ उबाळे , युवासेना भोसरी विधानसभा प्रमुख अमित शिंदे शहर संघटक सचिन सानप , उपविधानसभा अधिकारी सुनील समगीर , विधानसभा संघटक सार्थक दोषी , स्वप्नील शिरसाठ , विभाग अधिकारी अभिजित गिरी, कौस्तुभ गोळे ,अनिकेत येरूनकार , अभिषेक सुरवसे , रतीकांत वायदंडे , शिवसेना शाखा प्रमुख सुजित साळवी , महेश डोके , मयूर फिरके , सुहास तळेकर , शुभम महाडिक , किरण सानप तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते , वृक्ष रोपण कार्यक्रमाचे नियोजन भोसरी विधानसभेच्या वतीने कार्यक्रमाचे नियोजन करून युवसैनिकांनी झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम पर्यावरण पूरक उपक्रम चालू ठेवण्याचे ठरविले आहे.