शबनम न्युज | पुणे
रेल्वेने पाठवल्या जाणाऱ्या पार्सल चे आता स्कॅनिंग होणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत रेल्वेने त्यांच्या मार्फत पाठवला जाणाऱ्या पार्सल चे स्कॅनिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणता पार्सलमधून नेमकं काय जात आहे, याबाबत पारदर्शकता राहणार आहे.
Advertisement
यासाठी पुणे रेल्वे प्रशासनाने दोन स्कॅनिंग मशीन देखील मागवल्या असून, लवकरच त्या पुणे स्थानकावरील पार्सल कार्यालयात दाखल होणार आहेत. गेल्या वर्षी रेल्वेच्या पार्सल डब्यात स्फोटाच्या घटना घडल्या आहेत तर काही ठिकाणी पार्सलने तलवारी पाठवण्याचा प्रकार देखील उघडकीस आला आहे, या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी पुणे रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. याद्वारे संशयित वस्तू व पार्सल यावर नजर ठेवणे सोपे होणार आहे, येत्या काही दिवसात पार्सल कार्यालयात दोन मशीन दाखल होतील.