शबनम न्युज | चाकण
दंत रुग्णांसाठी मोठी बातमी आहे. चाकण मध्ये डॉ. भुजबळ दातांचा दवाखाना सुरू होत असून, या दातांच्या दवाखान्याचे भव्य उद्घाटन समारंभ रविवार दिनांक 21 मे 2023 रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार आहे. या उदघाटन प्रसंगी शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे, खेडचे कार्यसम्राट आमदार दिलीप मोहिते, तसेच भोसरी विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार महेश लांडगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
चाकण येथील जाधव कमर्शियल सेंटर चाकण शिक्रापूर रोड या ठिकाणी हा उद्घाटनाचा समारंभ पार पडणार आहे. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.धनंजय सुभाष भुजबळ व डॉ.अनुजा धनंजय भुजबळ तसेच चाकण नगर परिषदेचे आदर्श नगरसेवक , महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष प्रकाश शेठ राजाराम भुजबळ व महात्मा फुले परिषद पुणे चे अध्यक्ष श्री शांताराम बापू घुमटकर यांनी केले आहे.
या उद्घाटन समारंभाचे निमंत्रक माननीय डॉक्टर राजेश शेट्टी, बापूसाहेब भुजबळ , डॉ. दिगंबर साबळे, सुभाष भुजबळ, पांडुरंग धोंडीबा कोरे असून चाकण परिसरात नागरिकांसाठी या दातांच्या दवाखान्याचा फार मोठा लाभ होणार आहे.