पुणे : शबनम न्यूज
मावळ तालुक्यातील सानिका मारुती काजळे आणि अभिषेक मारुती काजळे या सख्या बहिण भावांनी पोलीस भरतीमध्ये जागा मिळविली आहे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दोघे बहिण भावांनी आपले शिक्षण पूर्ण करत आपल्या आईचे स्वप्न पूर्ण केले वडील मारुती काजळे हे सानिका लहान असतानाच त्यांचे निधन झाले दोघांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साते येथे झाले माध्यमिक शिक्षण जय शिवराय प्रतिष्ठान संचलित न्यू इंग्लिश स्कूल येथे आणि कॉलेज बीपीएस कॉलेज लोणावळा येथे पूर्ण केले अभिषेकने नवनीत करिअर अकॅडमी कामशेत येथे तर सानिकांनी शौर्य अकॅडमी वडगाव येथे पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेतले
Advertisement