पिंपरी चिंचवड – विशेष प्रतिनिधी । दि. १९ सप्टेंबर । पिंपरी-चिंचवडमधील कुमारी नायब मोहम्मद शकील शेख, वय-२५ वर्ष, दत्तवाडी, आकुर्डी येथील रहिवाशी आहेत. त्यांना किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करणे आवश्यक असून शस्त्रक्रियेसाठी साडे पाच लाख रुपये इतका खर्च अपेक्षीत आहे. उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पिंपळें निलख, येथे दाखल केलेले असून, त्यांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने खर्च त्यांना पेलवणारा नाही. तरी, कुमारी नायब मोहम्मद शकील शेख,यांच्या वरील वैद्यकीय उपचार / शस्त्रक्रिया करणेसाठी अधिकाधिक मदत व्हावी, यासाठी शेख यांनी आमदार बनसोडे यांना विंनंती केली. या मागणीची तात्काळ दखल घेत व विषयाचे गांभीर्य पाहून आमदार बनसोडे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यांना तात्काळ १ लाख रु मंजूर करून दिले.
आमदार अण्णा बनसोडे यांची सदर मागणी तात्काळ मान्य करत मुख्यमंत्री सहायता निधी मधून रुपये १ लाख मंजूर करण्यात आले. याबाबत मुलीचे वडील मोहम्मद शकील यांनी आमदार बनसोडे यांचे आभार मानले.