शबनम न्यूज | पिंपरी
दिनांक 29 मे 2023 ते 30 मे 2023 दरम्यान, औरंगाबाद येथे क्रीडा व युवक सेवा संचालय महाराष्ट्र राज्य यांनी नेमलेल्या श्री शांताराम जाधव अर्जुन पुरस्कार्थीं, श्रीमती गीता साखरे जेष्ठ कबड्डी मार्गदर्शिका, श्री बोंडे किशोर यांचे निवड समितीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा कला विकास प्रकल्प कबड्डी संघातील व राजमाता जिजाऊ ज्युनिअर कॉलेज भोसरी महाविद्यालयातील रेखा राठोड, भूमिका गोरे व मनीषा राठोड या तीन कबड्डी खेळाडूंची दिनांक 6 जून 2023 ते 12 जून 2023 दरम्यान दिल्ली येथे संपन्न होणाऱ्या 66 व्या 19 वर्षाखालील शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे, चिंचवड विधानसभा आमदार अश्विनी जगताप, माजी आमदार विलास लांडे, अभिषेक बारणे कैलास बाबा बारणे, मनीषा पवार, तानाजी बारणे, बाळासाहेब वाघमोडे, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, अतिरिक्त पिंपरी-चिंचवड मनपा प्रदीप जांभळे पाटील, उपायुक्त मनोज लोणकर, सहाय्यक आयुक्त माध्यमिक शिक्षण विभाग विजयकुमार थोरात, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, परशुराम वाघमोडे प्रशासन अधिकारी क्रीडा विभाग,क्रीडा पर्यवेक्षक दीपक कन्हेरे, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड यांनी या खेळाडूंना अभिनंदन करून त्यांना पुढील स्पर्धेत शुभेच्छा दिल्या.
तसेच सदर खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक आठवे बन्सी, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सोनाली जाधव ,क्रीडा मार्गदर्शक गोपीचंद करंडे यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.