शबनम न्यूज | पुणे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे शुक्रवारी (दि. 02) जून दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळातर्फे देण्यात आली आहे.
राज्य मंडळांनी इयत्ता दहावीची परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत पार पाडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात 8 लाख 44 हजार 116 मुळे आणि 7 हजार ते 30 हजार 67 मुलींचा समावेश होता. राज्यभरातील 533 केंद्रावर दहावीची परीक्षा झाली होती. बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागतो, याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. उद्या हा दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने लागणार आहे, निकाल पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करावे.
1 . mahresult.nic.in
2. https://ssc.mahresults.org.in
3. http://sscresult.mkcl.org