शबनम न्युज | मुंबई
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी चित्रपट ॲनिमलमुळे चर्चेत आहे. संदीप रेड्डी वनगा यांच्या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाबाबत अनेकदा काही ना काही अपडेट येत राहतात. आता या चित्रपटातील रणबीरचा नवा रूप देखील व्हायरल झाला आहे. तसेच चित्रीकरणादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर लिंक झाला आहे.
या चित्रपटातील रणबीर चा लुक इंस्टाग्राम वर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. चाहते देखील या लूकचा कौतुक करत आहेत. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रणबीर एका वर्गात उभा असलेला दिसत आहे. तसेच त्याने विद्यार्थ्यांचा गणवेश परिधान केलेला आहे, आणि तो शिक्षकांशी बोलत आहे.
हा व्हिडिओ रणबीर कपूर युनिव्हर्स ने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केला आहे. काही सेकंदाची ही क्लिप या फॅन पेजवर पाहायला मिळेल, या व्हिडिओवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट देखील करीत आहेत.