प्रथम क्रमांकाचे पारितोषिक बीडीडीएस पुणे संघाने पटकावले
पिंपरी : भोसरीतील इंद्रायणी नगर येथे संत नगर चषक 2023 जिल्हास्तरीय व्हॅलीबॉल स्पर्धा संपन्न झाली त्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक बीडीडीएस पुणे संघाने पटकावले संत नगर स्पोर्ट्स क्लब आणि विलास भाऊ मडिगेरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने इंद्रायणी नगर, संत नगर चषक 2023 जिल्हास्तरीय व्हॅलीबॉल स्पर्धा संपन्न झाली.
स्पर्धेचे उद्घाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते झाले तर बक्षीस वितरण समारंभ कामगार नेते सचिन लांडगे यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी पंडित पाचचोरे, योगेश बोराटे, निलेश प्रधान, श्रीराम इचक, गणेश धुमाळ, हर्षल वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक बीडीडीएस पुणे संघाने पटकावले तर द्वितीय क्रमांक वाघेश्वर संघ (चऱ्होली ) तृतीय क्रमांक सातपूर उंब्रज संघ (जुन्नर) चतुर्थ क्रमांक अतुल दादा स्पोर्ट्स क्लब , पाचवा क्रमांक शिक्रापूर ए , सहावा क्रमांक संत नगर ए ( मोशी), सातवा क्रमांक डोरलेवाडी संघ आणि आठवा क्रमांक कोपरे जुन्नर संघ यांनी पटकावला स्पर्धेत बेस्ट नेटमन साठी साकुर उंब्रज संघाचा अल्फाज , बेस्ट शूटर साठी शिक्रापूर संघाचा दादा सायकर या खेळाडूंचा बेस्ट शिस्तबद्ध संघासाठी माऊली संघ संत तुकाराम नगर पिंपरी यांचा सन्मान करण्यात आला.
या वेळी आपली प्रतिक्रिया देताना विलास मडिगेरी यांनी सांगितले की खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात विविध संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे व खेळाडूंच्या उत्तम आरोग्यासाठी खेळ गरजेचा आहे त्यासाठी विविध स्पर्धा घेतल्या जातात राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा घेण्याचे नियोजन आगामी काळात केले जाणार आहे.