शबनम न्युज | पिंपरी
अभय भोर इंडस्ट्रीज असोसिएशन डॉ. डी. वाय. पाटील आर्ट्स अँड कॉमर्स नाईट कॉलेज आणि फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन या संस्थांमध्ये आज एमआयडीसीतील कामगारांना रात्र पाळी मध्ये पदवी शिक्षण देण्यासाठी करार करण्यात आला.
यावेळी डी वाय पाटील कॉलेजच्या प्राचार्य रणजीत पाटील सर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री अभय भोर यांना कराराची प्रत दिली यावेळी उपप्राचार्य बाबर सर आणि शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते श्री अभय भोर यांच्या पुढाकाराने पुढील काळात एमआयडीसी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला आणि पुरुष कामगारांना पुढील शिक्षण घेण्याची संधी निर्माण होणार असून कर्मचाऱ्यांना काम करून कॉलेजला शिक्षण घेण्यासाठी जमत नाही त्यासाठी श्री अभय भोर यांनी कामगारांना पुढील शिक्षण घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आणि कर्मचाऱ्यांना शिक्षणाअभावी पदोन्नती मिळत नाही आणि कंपन्यांमध्ये अत्याधुनिक मशनरी आल्या आहेत आणि वाढते तंत्रज्ञान पाहता शिक्षित कर्मचारी असणे गरजेचे असते आणि पुढील शिक्षण घेण्याची तयारी असते परंतु काम करून कॉलेजला जाऊ शकत नसल्यामुळे यापासून अनेक कामगार वर्ग वंचित राहिला होता एमआयडीसी मध्येच अनेक कंपन्या अशा आहेत त्या कंपन्यांमध्ये कॉलेजचा वर्ग चालू करणे जागा उपलब्ध असते.
या ठिकाणी कंपनीतील काम संपल्यानंतर कर्मचाऱ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी संधी निर्माण होऊ शकते ज्यामध्ये शिक्षणाची सोय उपलब्ध करता येऊ शकते या ठिकाणी कॉलेजचे प्रतिनिधी येऊन संध्याकाळच्या वेळी कंपनीमध्येच त्यांचे पुढील शिक्षण देण्यासाठी सुविधा निर्माण केली जाईल तसेच अल्प फी ठेवून समाजात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातील आणि कंपन्या आपला सीएसआर निधी या कामासाठी वापरू शकतात आणि त्याचा फायदा कामगार वर्गाला होणार आहे कामगारांनी लाभ घेऊन शिक्षणापासून वंचित राहिलेल्या नागरिकांना पुढील काळात यशस्वी होण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री अभय दादा भोर यांनी केले.