शबनम न्युज | पिंपरी
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी व काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड येथे काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दिलीप पांढरकर यांच्या वतीने भव्य रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले. तसेच अनेक रुग्णांनी आपले डोळे या शिबिराच्या निमित्ताने तपासून घेतले या शिबिरात नेत्र तपासणी करणाऱ्या रुग्णांना चष्म्याचे वाटप करण्यात आले.
यानिमित्ताने भव्य आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन यावेळी करण्यात आले या आरोग्य तपासणी शिबिरात अनेक रुग्णांनी आपली आरोग्याची तपासणी करून घेतली.
रक्तदान सर्वश्रेष्ठ दान या विचाराने तसेच अनेक रुग्णांना रक्ताची गरज असते ऐनवेळी रक्त मिळणे कठीण असते रक्ता अभावी रुग्णांना आपला जीव गमावा लागतो रक्ताची टंचाई भासू नये रक्तपेढीमध्ये प्रत्येक दिवशी रक्ताचा साठा भरपूर असावा मानवाला माणुसकीच्या नात्याने रक्तदान करायला हवे . तसेच अनेक नेत्र रुग्ण यांना डोळ्यांचा त्रास असतो पण पैसे अभावी रुग्ण आपले डोळे तपासणी योग्य वेळी करू शकत नाही तसेच चष्मेही खरेदी करू शकत नाही अशा रुग्णांसाठी दिलीप पांढरकर यांच्या वतीने भव्य नेतृत तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात समाजसेवा ही अनेक सामाजिक उपक्रमातून दिली जाते या उद्देशाने दिलीप पांढरकर यांनी पिंपरी चिंचवड शहरात रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिर आयोजन केले.
यावेळी श्रीमती शामलाताई सोनवणे माजी अध्यक्षा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महिला कमिटी, बिंदूताई तिवारी उपाध्यक्षा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी, सायलीताई नढे महिला शहराध्यक्षा पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेस कमिटी, सौ प्रतिभा कांबळे औद्योगिक सेल शहराध्यक्षा , सौ शितलताई कोतवाल प्रभारी असंघटित काँग्रेस महाराष्ट्र स्वातीताई शिंदे उपाध्यक्षा महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश , आशा भोसले उपाध्यक्षा पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेस कमिटी
दिलीपशेठ पांढरकर कार्याध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेस कमिटी, एडवोकेट अनिरुद्ध कांबळे वरिष्ठ उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटी, वैशालीताई परदेशी माजी नगरसेविका उपाध्यक्ष सेवा दल महाराष्ट्र काँग्रेस पिंपरी चिंचवड महानगरपालिका माजी नगरसेवक श्री तुकाराम भोंडवे, श्री राजाभाऊ गोलांडे, श्री विश्वास गजरमल, श्री अख्तरभाई चौधरी, बबनराव जाधव दत्तात्रय दातीर पाटील , किरण नढे , अमित पांढरकर, एडवोकेट राजेंद्र काळभोर, सचिन गायकवाड, रवींद्र कांबळे, बाबुलाल वाघमारे, संदेश नवले, आबासाहेब खराडे, मयूर जयस्वाल सरचिटणीस महाराष्ट्र युवक काँग्रेस , मकरध्वज यादव, गौरव चौधरी, अमरसिंह नाणेकर, शैलेश वाल्हेकर, दिनकर भालेकर, पै किसन भालेकर, राहुल जाधव, गणेश साने सूत्रसंचालन हर्षवर्धन पांढरकर, सुरेश लिंगायत यांच्यासह अनेक मान्यवरांनी या आरोग्य शिबिरात उपस्थिती दर्शविली