शबनम न्यूज | पिंपरी
शिवपुर्णा प्रतिष्ठान पूर्णानगर च्या वतीने दिनांक १८/०२/२०२२ ते १९/०२/२०२२ रोजी शिवजयंती उत्सवाचे आयोजन शनी मंदिर मैदान पुर्णानगर येथे करण्यात आले होते. दिनांक १८/०२/२०२२ रोजी शिवव्याख्याते शशिकांत कुसेकर यांचे शिवचरित्र या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तसेच दिनांक १९ /०२ /२०२२ रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबिरास ५५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. व संध्याकाळी ७ वाजता शिवरायांची महाआरती पार पडली .शिवरायांची आरती झाल्यानंतर साई ढोल ताशा पथक संभाजीनगर याचे ढोल ताशा वादनाचा कार्यक्रम पार पाडला .सदर कार्यक्रमाचे आयोजन शिवपुर्णा प्रतिष्ठान व अनिकेत पवार मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते . सदर कार्यक्रमास माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ दादा पवार,माजी महापौर मंगलाताई कदम, नगरसेवक तुषारभाऊ हिंगे,माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे , राष्ट्रवादी ओबीसी सेल महिला अध्यक्ष सारिका ताई पवार राष्ट्रवादी महिला काँग्रेस कार्याध्यक्ष ज्योती ताई गोफणे राष्ट्रवादी महिला काँग्रेस भोसरी विधानसभा अध्यक्ष मनीषा ताई गटकळ , सुनील कदम, कुशाग्र कदम , स्वप्नील शेंडगे ,करन रोकडे , संभाजी बालघरे , विकास गर्ग , सुजित रासकर ,अनिकेत बाबर उपस्थित होते.