शबनम न्युज | पुणे
प्रेमाला नकार दिल्याने चिडलेल्या तरुणाने महाविद्यालयीन तरुणीवर पुण्यातील सदाशिव पेठ येथे प्राणघातक हल्ला केला. या घटनेत तरुणीही गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर पुना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
दर्शना पवार हत्या प्रकरण ताजे असतानाच पुण्याच्या सदाशिव पेठ ही धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सदाशिव पेठेतील पेरू गेट पोलीस चौकीपासून अवघ्या काही अंतरावर हा प्रकार घडला. प्रेमाला नकार दिल्याने चिडलेल्या तरुणाने या तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेनंतर तरुणाला जमावाने चांगला चोप दिला आणि त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Advertisement