शबनम न्युज | कुरुळी
कुरुळी गावच्या उपसरपंचपदी प्रतिभाताई कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कुरुळी गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात गावच्या सरपंच अनिता बधाले यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी ग्रामविकास अधिकारी कविता कोतवाल यांनी निवडणूक अधिकारी म्हणून यांनी काम पाहिले.
माजी जिल्हा परिषद सदस्य शांतारामदादा सोनवणे यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच प्रतिभा कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये खेड पंचायत समिती सभापती अमरभाऊ कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य कमलताई, कड, माजी सरपंच व. विद्यमान सदस्य शरदकाका मुऱ्हे, माजी सरपंच देवराम तात्या सोनवणे, कविता गायकवाड, माजी उपसरपंच एम . के आण्णा सोनवणे, विजय कांबळे, अमोल सोनवणे, शोभा गायकवाड नेहा बागडे, विशाल सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य दिपक डोंगरे, गुलाब कांबळे मनिषा मुऱ्हे, जैदाताई, माधुरी मालशिखर, तसेच माजी सदस्य स्वप्निल काबळे, जितेंद्र कांबळे (SRP खेड ता. अध्यक्ष) पो. पा. प्रतिभा कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते.