शबनम न्यूज | मुंबई
बॉलीवूडचा किंग शाहरुख खानच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. शाहरुखला अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये शूटिंग दरम्यान गंभीर दुखापत झाली आहे. शाहरुखवर वाढत्या रक्तस्त्रावामुळे शस्त्रक्रियाही करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शाहरुख खान आपल्या आगामी चित्रपट जवान मुळे चर्चेत आहे. एका प्रोजेक्टसाठी अमेरिकेत लॉस एंजलिसमध्ये शूटिंगच्या दरम्यान शाहरुखच्या नाकाला दुखापत झाली. त्यानंतर शाहरुखवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
शाहरुखच्या नाकाला दुखापत झाली असून, दुखापतीनंतर त्याच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रक्तस्त्राव थांबण्यासाठी किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आली असून, काळजी करण्यासारखे काहीही नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. शस्त्रक्रिया नंतर शाहरुख भारतात परतला असून, तो मुंबईत या दुखापतीतून सावरत आहे.