पिंपरी प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्रीपदी खा.सुनिल तटकरे साहेब यांची प्रदेशाध्यक्षपदी व मा.धनंजय मुंडे साहेब यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी भेट घेत शुभेच्छा दिल्या या मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेवक राजाभाऊ बनसोडे,माजी नगरसेवक तुषारभाऊ कामठे,माजी नगरसेवक प्रविणशेठ भालेकर यांचा समावेश होता.
काल हि पिंपरी चिंचवड शहरातील नाना काटे ,भाऊसाहेब भोईर , संजोगवाघेरें यांच्या सह अनेक नेत्यांनी अजित पवार यांना भेटून शुभेच्छा दिल्या आहेत पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी ही अजित पवार यांच्या पाठीशी असल्याचे यामुळे संकेत मिळत आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे हे पहिल्यापासूनच अजित दादा यांचे समर्थक राहिले आहेत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले होते की जेथे दादा तेथे मी याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहरातील अनेक नेते हे अजित पवार यांच्या सोबत आहेत आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी पक्षासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असल्याची चर्चा या निमित्ताने शहरात होत आहेत