प्रभागातील नागरिकांच्या असंख्य शुभेच्छांनी झाला वाढदिवस साजरा
पिंपरी प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील सौ.नीलिमा मनोज जरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.यामध्ये अनावश्यक होणाऱ्या खर्चाला आळा घालत देहु येथील वृद्धाश्रमात अन्नधान्य वाटप करण्यात आले.
प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडावात असताना कधी कधी आक्रमक होणाऱ्या सौ.नीलिमा मनोज जरे,या वृद्धाश्रमातील वृद्ध माता पिता ज्यांचे मुले मुली नाहीत किंवा काहींना असून देखील सांभाळत नाहीत अश्यांशी अतिशय मायेने त्यांची विचारपुस करत असताना थोडी भावुक झाल्या
तसेच वाढदिवसाचे औचित्य साधत प्रभागातील माता भगिनींसाठी विचारांची तशीच पैश्यांची देवाणघेवाण व्हावी यासाठी “नारी शक्ती महिला मंच बचत गटाची” स्थापना यावेळी करण्यात आली.
झाडे लावा… झाडे जगवा..या तत्वानुसार वाढदिवसानिमित्त निसर्गाचा समतोल राखला जावा यासाठी वृक्षारोपण सारखा स्तुत्य उपक्रम यावेळी राबविण्यात आला.या वेळी प्रभागातील अनेक नागरिकांनी महिलांनी सौ.नीलिमा मनोज जरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या