पिंपरी प्रतिनिधी :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात प्रत्येक चौक तिथे मनसेचा झेंडा या कार्यक्रमाची सुरुवात काल शाहूनगर या ठिकाणाहून सुरुवात झाली.
शाहूनगर मधील महाबली चौक दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ संध्याकाळी सहा वाजता सर्व मनसैनिक व पदाधिकारी यांच्या मोठ्या संख्येमध्ये मोठ्या थाटामाटात या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमांमध्ये शाहूनगर चे उपविभाग अध्यक्ष कैलाश दादा दुर्गे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते, महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस, व पिंपरी चिंचवडच्या प्रभारी गणेश आप्पा सातपुते यांच्या हस्ते पहिला ध्वज नवनगर महाबली चौक या ठिकाणी फडकवण्यात आला या महाबली चौकात स्थानिक सर्व नागरिक उपस्थित होते.
राज ठाकरे यांच्या आदेशाने पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये मुख्य चौकात मनसेचा राजमुद्रा असणारा ध्वज त्या त्या भागातील नागरिकांच्या हस्ते,व मनसैनिकांच्या वतीने त्या त्या चौकात लावण्यात येणार आहे सुमारे 100 नंबर ध्वज पूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य प्रमुख चौकात लावण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी शहराध्यक्ष सचिन चिखले, गणेश (आप्पा) सातपुते ,बाळा दानवले, विशाल मानकरी, राजू सावळे, दत्ता देव तरसे, अश्विनी बांगर, संगीता देशमुख, अनिता पांचाळ, विद्या कुलकर्णी , अदिती चावरिया, सचिन मिरपगार, सत्यम पत्रे, मयूर हजारे, अण्णा कापसे, नितीन चव्हाण, नारायण पठारे व अन्य सर्व मनसैनिक व नागरिक उपस्थित होते,