शबनम न्यूज – वृत्तसंस्था , प्रतिनिधी :
सप्तर्षी फाउंडेशन,निर्वाण दिव्यांग संस्था व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी पुणे यांच्यातर्फे दिनांक २ जुलै २०२३ रोजी श्री.लक्ष्मीबाई बारणे उद्यानातील्, वाकड येथे विशेष (दिव्यांग) मुलांकरीता ९ वे मोफत होमिओपॅथी उपचार शिबिर संपन्न झाले. या शिबिरात ५९ दिव्यांग बालकांनी लाभ घेतला. या शिबिराची सुरुवात १२ ऑगस्ट २०२१ पासून केली या प्रयत्ना अंतर्गत शेकडो दिव्यांग बालकांच्या कुटुंबांना खूप मोठा आधार व लाभ सप्तर्षी फाउंडेशन च्या माध्यमातून मिळाला आहे.या उपक्रमाअंतर्गत नोंदणी झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत कायमस्वरूपी उपचार दिले जातात.
सदर शिबिर कै.डॉ. प्रफुल्ल विजयकर सर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच होमिओपॅथीचे जनक डॉ.सम्युयल हनिमन्न यांच्या प्रेरणेने आयोजित केले जाते. कै.डॉ.प्रफुल्ल विजयकर सर यांनी २००५ साली सेवा भावातून विशेष मुलांसाठी महाबळेश्वर येथे चारिटेबल होमिओपॅथिक कॅम्पची सुरुवात केली. आज पर्यंत विजयकर सरांमुळे हजारो विशेष मुलांना निस्वार्थ भावनेतून शास्त्रशुद्ध होमिओपॅथी उपचार घेता आले आहेत.परंतु त्यांच्यानंतरही प्रेडीक्टीव होमिओपॅथीचे विद्यमान संचालक डॉ अंबरीश विजयकर सर व तरंग विजयकर सर यांनी हि सेवा अविरतपणे चालु ठेवण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. सदर शिबिर संपन्न होण्यासाठी प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीचे पुणे शाखा प्रमुख डॉ.रजत मालोकार साहेब यांनी पुढाकार घेतला.
सप्तर्षी फाउंडेशनने गेले अनेक वर्षे दिव्यांग बांधवांनसाठी काम करत आहे, त्यासोबतच संस्थेच्या विविध सामाजिक क्षेत्रातील कामगिरी खालील प्रमाणे आहे.सप्तर्षी समग्र दिव्यांग सेवा प्रकल्प,बेवारस मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार,शीतऋतू मध्ये गरजू व्यक्तींना मोफत चादर वाटप,दुष्काळग्रस्त भागात जलसंधारण कार्य,गरजू तसेच होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत इत्यादी.
शिबिराचे उद्घाटन प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीचे डॉ.रजत मालोकार साहेब, श्री.विजय आहेर सर संचालक, नियोजन विभाग, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई), सौ. चित्रलेखा राजुस्कर (प्राध्यापिका, कर्वे समाज सेवा संस्था), सप्तर्षी फाउंडेशनचे संस्थापक सचिव श्री.मनोजकुमार बोरसे, सप्तर्षी फाउंडेशनचे प्रशासकीय प्रमुख सौ रुशाली बोरसे, सौ ज्योती आघारकर (निर्वाण दिव्यांग संस्था ), श्रीमती.वर्षा (नारी माजी कार्यकर्त्या ), समाजसेविका सौ विजया माने-सपकाळ, सौ रंजना सुतार या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी सप्तर्षी फाउंडेशन सतत करत असलेल्या विविध समाजोपयोगी कार्यासाठी सप्तर्षी फाउंडेशनला प्रोत्साहन दिले व पुढील कार्याकरिता सप्तर्षी फाउंडेशन व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीला शुभेच्छा दिल्या.
या शिबिरात प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी तर्फे मुख्य समुपदेशक डॉ. रजत मालोकार सर, डॉ.सौम्या डॉ.जीविका, डॉ.मयुरी, डॉ.प्रियांका सावके, डॉ.सिमरन, डॉ.स्वाती, डॉ. हनी ओस्वाल, डॉ.प्राजक्ता, डॉ.मुस्कान, डॉ.सात्विक, डॉ.निवेदिता, डॉ.वैष्णवी, डॉ.शिव , डॉ.अंकिता, डॉ.प्रनवी, डॉ. मनीषा, डॉ. धवल, डॉ. प्रियांशी डॉ.शिवानी, डॉ.सौरभ, डॉ.स्नेहल, डॉ. प्रियंका धमाल, डॉ.साईरूपा, डॉ.ओंकार इत्यादी डॉक्टर उपस्थित होते.
सप्तर्षी फाउंडेशनचे संस्थापक सचिव श्री.मनोजकुमार बोरसे, सौ.रूशाली बोरसे, श्री.सतीश ढगे (सप्तर्षी- पालक प्रतिनिधी ) तसेच श्री. अक्षय वऱ्हाडे, कु.प्रथमेश कदम संस्थेच्या वतीने उपस्थीत होते. तसेच श्री .अनिकेत शेटे व श्री.प्रदीप सिंग, श्री अविनाश वाल्हेकर, श्री भूषण सर व श्री. विश्वास पवार यांनी देखील जबाबदारी पार पाडली. सदर कार्यक्रमास सौ.चंद्रिका सुतार, सौ.रंजना सुतार, कु.हर्षल सुरुशे इत्यादी स्वयंसेवकांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी पुढाकार घेतला.
तसेच सदर कार्यक्रमात “दिव्यांग बांधवांसाठी इंटिग्रेटेड वन स्टॉप सोल्युशन” या प्रोजेक्टचे सादरीकरण करण्यात आले. सदर संकल्पना भारत सरकार च्या कॉपीराईट विभागाकडून मान्यताप्राप्त असून लवकरच पेटंट कायद्याअंतर्गत नोंदणी करण्यात येईल. सदर प्रकल्प भारतातील पहिला प्रकल्प असून पिंपरी चिंचवड परिसरातील दिव्यांग बांधवांसाठी प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी लवकरच सुरू होईल असेच असे मनोजकुमार बोरसे सर यांनी सादरीकरणा दरम्यान सांगितले.
सदर शिबिरासाठी श्री सोमनाथ मोरणे, सौ. रंजना सुतार, सौ.दिशा भटनागर, श्री.निशांत गौर, श्री मंगेश सुरवसे, सौ. ज्योती आघारकर या दानशूर व्यक्तींकडून आर्थिक सहयोग प्राप्त झाला.
अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी सप्तर्षी फाउंडेशनच्या संकेतस्थळावर https://saptrishifoundation.in/ तसेच Saptrishi Foundation या YouTube माध्यमावर भेट देऊ शकता.
सप्तर्षी फाउंडेशनच्या प्रकल्प कार्यालयाचा पत्ता पुढीलप्रमाणे – ऑफिस नं १०४, पहिला मजला, रेन्बो प्लाझा, मॅकडोनाल्ड शेजारी, रहाटणी-पिंपळे सौदागार पुणे-१७ संपर्क : ९१७२७१६६३०/९६६५३६३१७७
संस्थेचे संकल्प आणि प्रकल्प राबविण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा सौ.वैशालीताई मुळे, सचिव श्री. श्रीकांत चव्हाण व सदस्य श्री. वरून सावरे यांचे मार्गदर्शन वेळोवेळी प्राप्त होते. त्याबद्दल श्री मनोज बोरसे यांनी त्यांचेही आभार मानले.