पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवक पतसंस्थेचा ५१ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्ताने पतसंस्थेच्या मोबाईल अँपचा अनावरण सोहळा संस्थेचे तज्ज्ञ मार्गदर्शक श्री. शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. प्रदीप जांभळे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून पतसंस्थेच्या सर्व सभासदांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. याकामी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच याप्रसंगी रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्यासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय रक्तपेढी विभागाचे मुख्य रक्त संक्रमण अधिकारी डॉ. शंकर मोसलगी यांनी विशेष सहकार्य केले.
या कार्यक्रमानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवक पतसंस्थेचे चेअरमन श्री. सनी कदम, व्हा. चेअरमन श्री. अनिल लखन, सचिव श्री. वैभव देवकर, खजिनदार श्रीम. विजया कांबळे, संचालक श्रीम. चारुशीला जोशी, श्री. नथा मातेरे, श्री. विश्वनाथ लांडगे, श्री. भास्कर फडतरे, श्री. ज्ञानेश्वर शिंदे, श्री. चंद्रकांत भोईर, श्री. विजय नलावडे, श्री. कृष्णा पारगे, श्री. संदीप कापसे, श्री. शिवाजी येळवंडे, श्री. योगेश रानवडे, श्री. विजय मुंडे, श्री. विशाल भुजबळ, श्री. गणेश गवळी, श्री. अभिषेक फुगे, स्वीकृत संचालक श्री. युनूस पगडीवाले, सल्लागार मंडळ, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्व अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री. प्रल्हाद सुतार यांनी उपस्थितांचे आभार मानले.