पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :
संपुर्ण पिंपरी चिंचवड शहरात वापरातील बीआरटीएस मार्गात सिग्नल पॉइंटवर टेबल स्पीड ब्रेकर बसवावे अशी मागणी करणारे पत्र माजी नगरसेवक , विरोधीपक्षनेते नाना काटे यांनी मनपा आयुक्त यांच्या कडे केली आहे बीआरटीएस रस्त्याचे जाळे आहे व ते व्यवस्थीत चालु आहेत. परंतु बीआरटीएस मार्गात इतर खासगी वाहने देखील प्रवास करतात तसेच सिग्नलच्या जवळ बीआरटीएस चा सिग्नल सुटला की डाव्या व उजव्या बाजुने नागरिक अनावधाने टर्न घेतात किंवा खासगी वाहने जोरात जातात अशाने बरेच छोटे मोठे अपघात होतात व काही ठिकाणी जिवीतहाणी देखील झाली . अशा देखील घटना घडल्या असुन ही खुप गंभीर बाब असुन याचा विचार करता, बीआरटीएस मार्गा मधील सिग्नल पॉइंटवर टेबल स्पीड ब्रेकर बसविण्यात यावे.असे मागणी पत्रात म्हंटले आहे तसेच यासाठी संबंधित विभागाला त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी सूचना देण्यात याव्या. असे नाना काटे यांनी पत्रात नमूद केले आहे