पिंपरी दि.१५ जुलै २०२३:- पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे नियोजन समिती शहराध्यक्ष अकबर भाई मुल्ला यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांची भेट घेतली या भेटीदरम्यान अकबर भाई मुल्ला यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या तसेच पिंपरी चिंचवड शहरातील समस्या संदर्भात निवेदन देऊन सदर समस्या सोडविण्यास प्राथमिकता द्यावी अशी विनंती केली .
अकबर भाई मुल्ला यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्व घटकांना सर्व धर्मांना अल्पसंख्यांक दलित सर्व गोरगरीब जनतेला न्याय देण्याची भूमिका घेत असतात अजित पवार हे प्रत्येक जाती धर्मातील व्यक्तींना तसेच शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारा जोपासत न्याय देणारे व महाराष्ट्र राज्याचा विकास करत आपली विकासाची वाटचाल जोमाने सुरू ठेवणारे व्यक्तिमत्व आहे यासाठी अजित पवार यांची आपण भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व पिंपरी चिंचवड शहरातील समस्यांचे निवारण करण्याची विनंती केली असल्याचे यावेळी अकबर भाई मुल्ला यांनी सांगितले.