शबनम न्युज | पुणे
कोथरूड परिसरातून देश विरोधी कृत्याच्या संशयावरून दोन आरोपींना पुणे पोलीस आणि एटीएसने ताब्यात घेतले आहे. तर या घटनेतील एक आरोपी फरार आहे. काल मंगळवार (दि. १८) पुणे पोलिसांकडून दिवसभर दोन्ही तरुणांची चौकशी करण्यात आली.
तपासादरम्यान, दोन्ही तरुणांच्या लॅपटॉपमध्ये संशयास्पद माहिती आढळून आली असून, त्याबाबत पुणे पोलीस तपास करीत आहेत तसेच फरार आरोपीचा देखील पुणे पोलीस शोध घेत आहेत. कारवाई केल्याच्या संशयावरून दोन्ही तरुणांना अटक करण्यात आलेली आहे. याबाबत अधिक तपास पुणे पोलीस करीत आहेत.
Advertisement