शबनम न्युज | नवी दिल्ली
दिल्लीत एनडीएची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपाच्या निमंत्रणानंतर उपस्थित होते. परंतु या बैठकीनंतर काहीच वेळात वेगळे चित्र माध्यमांना पाहायला मिळाले.
बैठकीनंतर काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाहेर पडले. मात्र त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार नव्हते. जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानतळावर गेले, तेव्हा अजित पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यात बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे.
ही बैठक जवळपास अर्धा तास चालली. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधान येत आहेत. तसेच एनडीएच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी नेत्यासोबत देखील आणखी एक बैठक झाली. ज्यामध्ये अजित पवार, अमित शहा, जे.पी.नड्डा आणि प्रफुल्ल पटेल यांचा समावेश होता.