शबनम न्युज | जळगाव
जळगाव येथे घरी लवकर जाण्याच्या घाईने एका तरुणाने चक्क पुरात उडी मारली. उडी मारल्यानंतर तरुण पुरात वाहून जात असताना,त्याला सुखरूप पुरातून बाहेर काढण्यात यश आले आहे. ही घटना जळगाव येथील रावेर तालुक्यातील आहे. गणेश कोळी (वय ३५, रा.रावेर) असे या तरुणाचे नाव आहे.
Advertisement
वाघोड येथे करजोद नाल्याच्या पुरातून मोरगाव कडे जात असलेल्या गणेश कोळी याला तेथील नागरिकांनी पुरातून जाण्यास मज्जाव केला. मात्र, न जुमानता तो पुढे गेला. रेल्वे पुलाखालून तो वाहून गेला.पुढे त्याला मोरगाव जवळ पट्टीच्या पोहणाऱ्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर आपण स्वतःच पुराच्या पाण्यात उडी घेतली होती आणि घरी जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून उडी घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.