शबनम न्युज | पिंपरी
योगदान प्रतिष्ठान आणि माजी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या संकल्पनेतून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने 53 हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम संपन्न झाला.
आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात सेवा दिवस साजरा करण्याचे ठरवलेले आहे. त्याच अनुषंगाने सदर वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आले असल्याचे यावेळी सुरेश भोईर यांनी सांगितले. तसेच या वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये पिंपरी चिंचवड मध्ये देशी वंशाचे वृक्ष, वड, उंबर, पिंपळ, कडूलिंब, देशी झाडांचे वृक्षारोपण चिंचवड येथे पवना नदीच्या कडेला नवीन विस्तारलेल्या 18 मीटर डीपी रोडला दोन्ही बाजूमध्ये करण्यात आले.
याप्रसंगी या प्रसंगी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर, महेशजी कुलकर्णी , विठ्ठल भोईर ,रविंद्र देशपांडे , गतिराम भोईर , सोनाताई गडदे, माधुरीताई गुरव , पल्लवीताई पाठक , दिपाली कलापुरे, रविंद्र प्रभूणे, प्रशांत आगज्ञान, परबत गुरुजी , राजाराम कोंढाळकर,शिवाजी पाटील , कैलास राणे , रामभाऊ गावडे , विजय अरक , पंजाबराव मोंढे, सुनिल कुलकर्णी, मधुकर कुलकर्णी , राष्ट्रापाल भोसले ,धोडीबा गावडे , लक्ष्मण माहुरे, शिवाजी देशमुख ,शैलेन्द्र गावडे, हरिश्चंद्र कुलकर्णी ,योगेश गागरे ,सौरभ जगताप ,शुभम किवडे व इतर जेष्ठ नागरिक व महिला भगिनी उपस्थित होत्या.