शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पिंपरी चिंचवड अपंग विद्यालय, यमुना नगर, निगडी येथे माजी नगरसेविका सविता वायकर व त्यांच्या परिवाराच्या वतीने अल्पोहार देण्यात आला.
गेली अनेक वर्षे पिंपरी चिंचवड शहरात सामाजिक कार्याच्या माध्यमातून नगरसेविका सविता वायकर व त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते अशोक वायकर व त्यांचा संपूर्ण परिवार गरजवंतांना उपयोगात येईल, असे उपक्रम राबवीत असतात. राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारण असणाऱ्या या परिवाराचे अपंग विद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
वायकर परिवार हा नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असतो. कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता, हा परिवार नेहमी इतरांना मदत करण्यात आनंद मिळत असतो. नगरसेविका सविता वायकर यांनी आपल्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड शहरात अनेक विकास कामांना गती देऊन समाजासाठी अनेक विकास कामे केली आहेत. महाविद्यालयात यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अशोक वायकर तसेच त्यांचे परिवारातील अनिल वायकर व इतर सदस्य उपस्थित होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर यावेळी आनंद दिसत होता. या सर्व परिवाराचे विद्यालयाच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.