पुणे, – पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यात विविध कार्यक्रम होणार आहे. यावेळी पुणे मेट्रो प्रकल्पाचे उद्धाटन होणार आहे.याच दरम्यान काँग्रेस वतीने काळे झेंडे लावून मोदींच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे आज सकाळ पासूनच काँग्रेस नेते कार्यकर्ते पुण्यात आंदोलन करीत आहे या मध्ये काँग्रेस चे आमदार रवींद्र धंगेकर , माजी आमदार मोहन जोशी , रमेश बागवे यांच्या सह अनेक सामाजिक संघटनांचा सहभाग या आंदोलनात आहे ; मणिपूर मधील घटणे संदर्भात मोदी यांनी काही प्रतिक्रिया हि व्यक्त केली नाही तसेच अनेक कारणाने पंतप्रधान मोदी यांचा निषेध करण्यात येत आहे आत्ताच्या ताज्या घडामोडी नुसार याला आंदोलनकऱ्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुणे शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन अन् विरोधकांचे आंदोलन सुरु असल्यामुळे पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विरोधकांनी पुण्यातील मंडई परिसरात आंदोलन सुरु केले आहे. मोदी यांनी मणिपूर विषयात चूप्पी तोडावी, अशी मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात आली आहे. आंदोलनस्थळी पोहचलेले काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आमच्या नेत्यांना अटक केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा ईशारा महाविकास आघाडीकडून करण्यात येणार आहे. पुण्यातील अंबिल ओढा चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. पाच हजार पोलिस कर्मचारी तैनात केले आहे.