शबनम न्युज | पुणे
लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला, या बाबत मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आतापर्यंत अनेक मान्यवरांना लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाला आहे, यात आता पंतप्रधान मोदींच्याही नावाचा समावेश झाला आहे. असे म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले आहे.
तसेच लोकमान्य टिळक युग आणि महात्मा गांधीचे युग या दोन्ही युगांचे योगदान कधीही विसरले जाऊ शकत नाही. गणेशोस्तव, शिवजयंती उत्सव यामध्ये लोकमान्य टिळकांचे महत्वाचे योगदान राहिले आहे, असे म्हणत शरद पवार यांनी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन दिले आहे.
ते म्हणाले, जहाल मतवाद्यांचा प्रतिनिधित्व लोकमान्य यांनी केले, तर ब्रिटिशांचा गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी जनतेला ही जागी केले पाहिजे, ते म्हणजे पत्रकारिता असे म्हणत टिळकांनी 25 व्या वर्षी केसरी सुरू केला, असेही शरद पवार म्हणाले.
तर देशात सर्जिकल स्ट्राइक विषयी बोलले जाते पण पहिला सर्जिकल स्ट्राइक छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यात केला होता. देशात अनेक राजे होऊन गेले मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य वेगळे, ते जनतेचे राजे, रयतेचे राजे होते. अलिकडच्या काळात या देशातल्या जवानांना देशाचं रक्षण करण्यासाठी साठी सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्याची चर्चा होते आहे. मात्र लाल महालात शायिस्तेखान जेव्हा आला होता तेव्हा या देशातला पहिला सर्जिकल स्ट्राईक हा शिवछत्रपतींच्या काळात झाला ही गोष्ट विसरता येणार नाही. अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील. आपण लोकमान्यांच्या नावाने दिला जाणाऱ्या पुरस्कारासाठी आलो. १८६५ मध्ये लोकमान्य टिळकांचे वडील गंगाधरपंत यांनी रत्नागिरी सोडली आणि ते पुण्यात आले. ते नुसतं आगमन नव्हतं तर एक प्रकारची ठिणगी होती. त्यानंतर ती स्वातंत्र्याच्या मशालीचं रुप त्याने घेतलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी केली. या पुरस्कार मिळालेल्यांच्या यादीत इंदिरा गांधी होत्या, खान अब्दुल गफार, बाळासाहेब देवरस होते, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह होते अशी अनेकांची नावं घेता येतील. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश झाला याचा आनंद आपल्याला सगळ्यांना आहे. त्यामुळे मी सगळ्यांच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी टिळक पुरस्कारासाठी जी निवड झाली त्याबद्दल मी त्यांचं अंतःकरणापासून अभिनंदन करतो असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.