शबनम न्युज | पुणे
डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी (आंबी,पुणे) यांच्या वतीने दि.७ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट दरम्यान, सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत ‘आरंभ ‘या फ्रेशमन ओरिएंटेशन प्रोग्रॅमचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले आहे.या उपक्रमाचे हे चौथे वर्ष आहे.डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू डॉ.सायली गणकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली .
अभियांत्रिकी ,व्यवस्थापनशास्त्र,आर्किटेक्चर ,फार्मसी, लॉ,डिझाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांचे स्वागत या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांच्या कारकिर्दीची पायाभरणी होण्यासाठी आणि वैयक्तिक विकासाची, व्यक्तिमत्व विकासाची योग्य सुरुवात म्हणून या कार्यक्रमाचे नियोजन केले जाते .
शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्तिमत्व,रोल मॉडेल त्यांच्यासमोर यावीत, यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. ‘बार्कलेज’चे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण वुक्ककलम,‘लुपिन लिमिटेड‘ चे उपाध्यक्ष रितूराज सार हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून अनिरुद्ध खेकाळे, सचिन कालगुडे, प्राद्यापक ओ.पी.शुक्ल,डॉ.विजय वधाई हेही उपस्थित राहणार आहेत.
इस्कॉन चे कृष्ण माधवदास,अँटिनार्कोटिक्सचे पोलीस उपनिरीक्षक सतीश पवार,आयटीसी इन्फोटेक चे प्रमोद हंकारे,डॉ.ज्योती जैन, प्राची कुलकर्णी, डॉ.संतोष राणे, ह्यासिंथ आर्या हे मार्गदर्शन करणार आहेत.दररोज १० ते ४ या वेळात ओरिएंटेशन प्रोग्राम पार पडणार आहे