शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात व्ही.व्ही.आयपी हे चिंचवड वाहतूक विभागाच्या हद्दीतील प्रा रामकृष्ण मोरे सभागृह चिंचवड या ठिकाणी एका कार्यक्रम करिता उपस्थित राहणार असून, सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने या कार्यक्रमास मोठ्या संख्येने कार्यकर्ते, प्रतिनिधी, इतर नागरिक उपस्थित राहणार असल्याने व्हीव्हीआयपी बंदोबसाच्या अनुषंगाने चिंचवड वाहतूक विभाग हद्दीतील मार्गावर वाहनासाठी काही रस्ते बंद करण्यात आले आहे. तसेच वाहतुकीत बदल देखील करण्यात आलेला आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
वाहतुकीचे बदल खालीलप्रमाणे –
१. महावीर चौक – महावीर चौकाकडून चिंचवड गावाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. यासाठी पर्यायी रस्ता महावीर चौक कडून खंडोबा माळ चौक येथून इच्छित स्थळी जातील.
२. दर्शन हॉल लिंक रोड – लिंक रोड कडून अहिंसा चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. त्यासाठी पर्याय रस्ता मोरया हॉस्पिटल चौक कडून इच्छित स्थळी जातील.
३. रिव्हर व्ह्यू चौक – रिव्हर व्ह्यू चौकाकडून चाफेकर चौक अहिंसा चौक बाजूकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आली आहे. त्यासाठी पर्याय रस्ता रिवर व्हिव चौकाकडून वाल्हेकर वाडी, बिजलीनगर मार्गे, इच्छित स्थळी जातील.
सदर बदल 6 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 8 वाजता दुपारी बारा वाजेपर्यंत अथवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत राहणार आहे, अशी ही माहिती पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.